प्रतिनिधी / उस्मानाबाद
कंटेनरने ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्याने ट्रॅव्हल्समधील २४ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.४) घडली असून शनिवारी (दि.६) मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एनएच ६५ रोडवर दाळिंब शिवारात अनिल कुमार यादव (रा. बिकाईपूर पोस्ट आईर जी.गया) याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्र. डब्ल्यु.बी. ११ डी. ४९७१) भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या मॉर्निग स्टार ट्रॅव्हल्सला (क्र. पीवाय ०५ ए. २२७७) जोराची धडक दिली. या वेळी ट्रॅव्हल्समधील अजीम सय्यद (रा.अनकोटा ता.येवला जि.नाशिक), शैल्याम गौंड, ब्रिजेश यादव व इतर २४ जण किरकोळ व गंभीर जखमी झाले. दरम्यान, जखमींना पोलिसांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजीम सय्यद यांच्या एमएलसी जबाबवरुन अनिल कुमार यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
Top