प्रतिनिधी | उस्मानाबाद
|
| व्हॉट्सअपच्या स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखवल्याची घटना शुक्रवारी (दि.५) घडली. याप्रकरणी शनिवारी तामलवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील अमित विलास गुंड(पाटील) याने मोबाइलमधील वॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित केली. तसेच देवा काळे, राहुल गुंड, निखील डांगे (सर्व रा. सुरतगाव ता. तुळजापूर) यांनी स्टेट्सवरील मजकुर तोंडी उच्चारून धार्मिक भावना दुखावल्या. याबाबत राहुल वाघमारे याने अमित गुंड (पाटील) यास फोनवरुन सदर चित्रफितीबाबत विचारपूस केली. त्यावेळी अमित गुंड (पाटील) याने तु मला कोण विचारणार असे म्हणून सुरतगावात ये तुझे पाय तोडतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी राजकुमार मसाजी कसबे (रा.तामलवाडी) यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मोबाइलमधील वॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित केली. |