प्रतिनिधी / उस्मानाबाद-पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोधचिन्ह, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक आर. राजा यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली येथे नक्षलवादी भागात कार्यरत असताना त्यांनी सन २०१८ मध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दि. २३ एप्रिल रोजीच्या कार्यालयीन आदेशाद्वारे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह / प्रशस्तीपत्र घोषित केले आहे. हे सन्मानचिन्ह त्यांना १ मे रोजी पोलिस कवायत मैदानावर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
|