उस्मानाबाद /प्रतिनिधी- हॅन्डबॉल, डॉजबॉल असोसिएशन, उस्मानाबाद जिल्हा क्रीडा कार्यालय व श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ एप्रिल ते ११ मे दरम्यान उमरगा येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी विघालय, उमरगा येथे आयोजित हे शिबिर मोफत असून सकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय खेळाडू व तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरासाठी डॉ. अनिल पाटील, सरपे, मुनीर शेख, कुलदीप सावंत, सुरवसे,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन असोसिएशनचे सचिव डॉ. महेश राजेनिंबाळकर, संजय देशमुख, प्रशांत घाडगे, दिलीप सावंत, मोहन पाटील, यांनी केले आहे. |