आबुधाबी (युएई) येथे पार पडलेल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेममध्ये भारतीय संघाने ३६८ पदके मिळवून पदकांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. यामध्ये कोळेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील आकाश तुकाराम आकोसकर याने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी गटामध्ये सुवर्णपदक व पुरुष दुहेरी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. |