प्रतिनिधी / उस्मानाबाद
मागील भांडणाची कुरापत काढून शेतात डोक्यात कुऱ्हाड व विळ्याने वार करून जखमी केले. यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडला.
अशोक मारुती गाडेकर यांना मागील भांडणाची कुरापत काढून विठ्ठल श्रीहरी येडके, दाजी श्रीहरी येडके, आप्पा श्रीपती येडके, श्रीहरी शामराव येडके, लक्ष्मण भिकाजी लांडगे, गोवर्धन नर्सिंग येडके (रा. गावसुद) दमदाटी करुन शिवीगाळ केली. तसेच डोक्यात कुऱ्हाड डाव्या हातावर, पाठीवर मारुन विळ्याने वार केले. तसेच दगडानेही मारहाण केली. यामध्ये गाडेकर गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या सहा जणांनी अशोक गाडेकर यांचे वडील मारुती गाडेकर यांनाही बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे अशोक गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबादच्या शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. 
 
Top