प्रतिनिधी/उस्मानाबाद -तालुक्यातील शेकापूर येथे दिनांक १३ ते २० एप्रिल या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील शेकापूर येथे शनिवार १३ ते २० एप्रिल या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ६ महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ६ ते ८ हरिपा', रात्री ९ ते ११ किर्तन तर रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत हरिजागर आदी दैनंदीन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहा दरम्यान दिनांक १३ एप्रिल रोजी हभप कालिदास महाराज घोडके (कामेगाव), १४ एप्रिल रोजी हभप बारगुळे गुरुजी (रईभर), १५ एप्रिल रोजी हभप भैरवनाथ महाराज (वाडगा), १६ एप्रिल रोजी हभप दिलीप पाटील महाराज (सांजेकर), १७ एप्रिल रोजी हभप रामचंद्र कुलकर्णी (ज्ञानेश्वर मंदिर, उस्मानाबाद), १८ एप्रिल रोजी हभप रामचंद्र कोळी (सारोळकर), १९ एप्रिल रोजी हभप रावसाहेब गुरुजी (वडगावकर) तर दिनांक २० एप्रिल रोजी हभप वसंत उंबरे महाराज (उस्मानाबाद) यांच्या काल्याचे किर्तन होणार आहे. किर्तनानंतर भाविक भक्तांसा'ी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या सप्ताहा दरम्यान परिसरातील गावातील महिला मंडळाचे भजन व हरिजागाराचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाचा शेकापूर व परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भजनी मंडळ व गावकNयांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
Top