प्रतिनिधी/ भूम-
तालुक्यातील पाथरूड येथे रविवारी (दि.७) घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भूम पोलिसांत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरूड येथे फिर्यादी वर्षा जीवन बोराडे व दुरुंदे कुटुंबीय जवळजवळ राहतात. शनिवारी (दि. ६) वर्षा भावाच्या गोठ्याकडे शेण आणण्यासाठी गेल्या असता त्यांना पांडू कोरे हा बापू विनायक तिकटे यांच्या लाकडाच्या ढिगाऱ्याजवळ उभा दिसला. अंधारात उभा राहू नकोस, असे सांगिल्यावर तुम्हाला लवकर काय उठायची गरज आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे हा प्रकार फिर्यादीने आपल्या पतीस सांगितला. फिर्यादी व तिचा पती दुरुंदे यांच्या घरी गेले. पार्वती दुरुंदे व फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास बोराडे कुटुंबीयांच्या घरासमोर तीन चारचाकी गाड्यातून गणेश दुरुंदे, उमेश दुरुंदे,पांडुरंग बापू कोरे यांच्यासह इतर १४ ते १५ जण आले. त्यांनी फिर्यादीची सासू, दीर, पती यांना मारहाण केली. आरडाओरड ऐकून धनंजय वसंत बोराडे,बापू विनायक तिकटे,गजेंद्र तिकटे हे आले. या लोकांना पाहून लोक गाड्या तेथेच सोडून पळून गेले. (एमएच २५ आर ५६३५),(एम एच १३ ए झेड २१२४),(एम एच २५ ए बी ७७७०) गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. याप्रकरणी गणेश विष्णू दुरुंदे, उमेश विष्णू दुरुंदे, पार्वती विष्णू दुरुंदे, प्रज्ञा उमेश दुरुंदे, पांडुरंग बापू कोरे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.