प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (दि. १०) अायोजित मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित शहरातून सायकवर रपेट मारली. जिल्ह्याचे तीन मुख्य अधिकाऱ्यांची सायकलस्वारी पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली हेाती. 
रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून झाली. छत्रपती शिवाजी हायस्कूल मार्गे, बार्शी नाका-भोसले हायस्कूल-आंबेडकर चौक मार्गे फिरल्यावर जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला. यामध्ये तीन्ही अधिकाऱ्यांनी सायकलवर स्वार होऊन शहरातून रपेट मारली. त्यांची सायकलस्वारी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, तहसिलदार अभय म्हस्के, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अभय वाघोलीकर, आंतरराष्ट्रीय खोखोपटू सारिका काळे, रवी मोहिते आदी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. सायकल रॅलीत शहरातील विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर्य चाणक्य विदयालय, आर.पी.कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅली यशस्वी करण्यासाठी अनिल वाघमारे, शशिकांत पवार, सिध्देश्वर कोम्पले, अयुब पठाण, योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे, व्यंकटेश दांडे, फिरोज सेठ, अनिल लांडगे, सुरेश कळमकर, अश्फाक शेख, हाफिज शेख, प्रवीण बागल, संतोष देशमुख, दत्तात्रय जावळे, तानाजी खंडागळे यांनी विशेष प्रयत्न केले. 
 
Top