प्रतिनिधी/प्रतिनिधी
जनेतेने मोठ्या कष्टांनी जमावलेला पैसा नोटाबंदी करून मोदींनी लुटुन घेतला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेले परिवर्तन मोदीसह अन्य राजकारणांच्या पचनी पडत नसुन अश लुटारूंना सत्तेवरून खली खेचा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबादेत केले. ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेस आले होते. यावेळी व्यासपीठावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, लिंगायत समाजाचे नेते शिवानंद एैबतपुरे, वंचितचे लोकसभेचे उमेदवार अर्जुन सलगर, लातुरचे आण्णासाहेब पाटील, रमेश गंगावणे, बालासाहेब बनसोडे, भैय्यासाहेब नागटिळे, अलंकार बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंबेडकर म्हणाले की, जिल्हयातील दोघंच्याभोवती राजकारण फिरवताना दिसत आहे. यामुळे त्यांनी बहुजन समाजाला ओळख्ून सोडले आहे. परंतु आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. यामुळे घरातील ही सत्ता उलथवुन टाका. तसेच सध्या देशातील राजकीय वातावरण ही बदलले आहे. परिणामी हे वातावरण पाहुन मोदींना वेड लागले आहे. शहिदांच्या मुद्दयावर राजकारण करत आहेत. पुलावामाच्या शहिदांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अनेक व्यापा-यांकडे जुन्या नोटा आहेत. त्या जुन्या नोटा बदलुन देण्याची एक संधी आम्ही सत्तेत आल्यानंतर देणार आहोत. असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. तसेच राज्यात नेक तालुक्यात दुष्काळ आहे, मात्र तेथे दुष्काळी छावण्या नाहीत.राजकर्ते निवडण्ुकीत दंग आहेत. यामुळे अश बेफिकीर सरकाला खाली खेचा असेही ते म्हणाले.
मोदींना चहा अन् शहांना पकाडे
विकण्यासाठी पाठविणार - जलील
ज्या मुद्दयावर मोदी देशाचे पंतप्रधान झाले ते मुद्दे बाजुला ठेवुन वेगळेच राजकारण सुरू आहे. काही पुढारी हे मुस्लिम मते ही आमची जागीर असल्याचे सांगत होते. मात्र आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन सर्वांना समान नयाय मिळत आहे. तसेच ही निवडण्ुक भारतीय असल्याचे लढवत आहे. भाजपामधील काही पुढारी हे सुशिक्षीत बेरोजगारांनी पकोडे विकण््याची भाषा करतात. परंतु वंचित आता मोदींना चाय-चाय करत तर अमित शहांना पकोडे विकत बसविणार असल्याचे ते म्हणाले.
 
Top