तेर/प्रतिनिधी
 उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील श्री सद्गुरु ब्रम्हचारी रामानंद महाराज मंदिरात श्री राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास शनिवारी (दि.६) विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. 
सकाळी दत्तगुरू मूर्ती पूजन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, कलश पूजन उपसरपंच पाटील, विणा पूजन मुकूंद पाटील, ज्ञानेश्वरी पूजन सरपंच शशिकला शिंदे, मृदंग पूजन महात्मा मगर, तुकाराम गाथा पूजन भगवान पाटील, ध्वज पूजन ग्रापं सदस्य राजूळ पवार, टाळ पूजन डकवाडीचे सरपंच काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हभप राम महाराज सुतार, किशोर मसे, हरिभाऊ शिंदे, शिवाजी हाजगुडे, नंदकुमार कदम, प्रकाश देशपांडे, दादा सुतार आदींसह भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात हभप अंकुश महाराज मगर, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, हभप शरद महाराज देशपांडे, हभप सच्चिदानंद महाराज कुलकर्णी, हभप हनुमंत महाराज मगर, हभप वसंत महाराज उंबरे, हभप आबासाहेब महाराज सुतार, हभप भिमराव महाराज आवटे, हभप व्यंकट महाराज शिंदे, हभप व्यंकट महाराज सिरसाठ, हभप अभिजीत महाराज भड, हभप तानाजी महाराज भोईटे, हभप बाबुराव महाराज पुजारी, हभप उत्तरेश्वर महाराज लोखंडे, हभप रामभाऊ महाराज बचाटे, हभप मुकुंद महाराज देवगीरे, हभप ढेरे महाराज, हभप योगेश बप्पा इंगळे यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. सोमवारी (दि.१५) हभप राम महाराज काजळेकर यांच्या काल्याच्या कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहची सांगता होणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काजळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
Top