उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शनिवार (दि.१३) पासून प्रारंभ होत आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत सप्ताह होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ३२ वे वर्ष आहे. 
सप्ताहात शनिवारी (दि.१३) हभप जाधव महाराज, रविवारी (दि.१४) महेश महाराज मडके, सोमवारी (दि.१५) बंडा तात्या महाराज कराडकर, मंगळवारी (दि.१६) ज्ञानेश्वर माऊली महाराज अनसुर्डेकर, बुधवारी (दि.१७) तुळशीराम महाराज लबडे, गुरूवारी (दि.१८) दिपक देशमुख महाराज, शुक्रवारी (दि.१९) योगेश महाराज पवार तर शनिवारी (दि.२०) संदिपान महाराज हसेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी मुख्य व्यासपीठ हभप नामदेव महाराज पवार तर गाथा भजन नेतृत्व हभप रघुनाथ महाराज जाधव, बबन महाराज मिटकरी, हरिपाठी नेतृत्व पांडूरंग टिंगरे, राजाभाऊ कासार, शिवाजी देवगिरे तर भजन नेतृत्व हभप राम सुतार महाराज हे करणार आहेत. या सप्ताहाचा लाभ भाविक-भक्तांनी घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे. 


 
Top