उस्माबाद/प्रतिनिधी
ढोकी तालुका उस्मानाबाद येथील छत्रपती शिवराय क्रीडा व सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष तथा पोलिस पाटील राहुल वाकुरे-पाटील यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ढोकी येथील पाणपोईचे उद्घाटन बुधवार दि.१० एप्रील रोजी करण्यात आले.
ढोकी येथील बसस्थानकाजवळ पाणपोई सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन गावकामगार पोलिस पाटील संघटनेचे मीडिया जिलाध्यक्ष सुभाष कदम-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राहुल वाकुरे-पाटील, धनराज सगर, दयानंद फुटाने, सुकूमार फेरे, राजेंद्र राऊत, चंद्रकांत बनसोडे, विनोद गजधने, सुषमाराणी सुरवसे, सुनिता जगदे, पिंटु काळे, तानाजी जाधव यांच्यासह ढोकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलिस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top