विधिज्ञांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी/ उस्मानाबाद
शहीद भारतीय सैनिकांचा निवडणूक प्रचारात वापर करून त्यांच्या नावे मते मागू नये असे निर्देश निवडणूक आयाेगाचे असताना शहिदांच्या नावे मते मागणाऱ्या तसेच काँग्रेसबाबत चुकीची माहिती देऊन बदनामी केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील विधिज्ञांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.९ एप्रिल रोजी औसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचे आवाहन करताना भारतीय सैन्याचा, शहीद झालेल्या सैनिक व कुटुंबीयांच्या नावाचा वापर करून आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करून मोदींवर प्रचारबंदी घाला.तक्रारीवर अॅड. विश्वजित शिंदे, अॅड. राहुल लोखंडे, अॅड. अतुल देशमुख, अॅड. गणपत कांबळे, अॅड. जयंत जगदाळे, अॅड. अजिंक्य शिंदे, अॅड. राघवेंद्र बाेधले, अॅड. एस.बी. तरवडे, अॅड. ए. व्ही. जाधव, रमेश माने, ए. एफ.पठाण आदींच्या स्वाक्षरी आहेत. तसेच टाकळी-बेंबळी येथील काकासाहेब सोनटक्के यांनीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. प्रचारादरम्यान चुकीची माहिती देऊन काँग्रेसची बदनामी तसेच जाती-धर्माच्या आधारे मते मागून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-यांनी मंगळवारीच औसा येथील सभेतील भाषणाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. 
 
Top