तुळजापूर/प्रतिनिधी-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.११) पोलिसांनी शहरात संचलन केले. या वेळी ४ पोलिस अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांनी संचलनात सहभाग घेतला. तालुक्यातील अतिसंवेदनशील अपसिंगा गावातही पोलिसांनी संचलन केले. सहायक पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी शहरात संचलन केले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महाद्वार, पावणारा गणपती, आर्य चौक, कमानी वेस , मंगळवार पेठ आदी मार्गावर संचलन करण्यात आले. त्यानंंंतर संवेेदनशील आपसिंगा गावात पोलिसांनी संचलन केले. 
 
Top