उस्मानाबद/प्रतिनिधी-
 धाराशिव लोकसभा महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आळणी,खेड,किणी येथे प्रचार सभेप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर,भाजपा नेते तथा एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटिल,शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटिल,भाजपा शहराध्यक्ष संदिप कोकाटे,धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,पं.स.सदस्य संग्राम देशमुख,माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे,महिला संघटक रेखा ताई लोमटे,आदिंच्या उपस्थित सभा संपन्न झाल्या या सभेत शंकरराव बोरकर म्हणाले की,राष्ट्रवादिच्या नेत्यांनी धाराशिव जिल्हयात मतमागण्याचा अधिकार केंव्हाच गमावला आहे.धाराशिव जिल्हयाचा नितिआयोगाच्या मागास यादित खालुन तीन नंबरचा जिल्हा हे पाप फक्त राष्ट्रवादिच्या नेत्यांचं आहे.या जिल्हयात विकास काम नकरता जिल्हयातील उद्योग धंदे बंद कशी पडतील.याचा विचार करणारी मंडळी कधीच जिल्हयाच भलं करू शकत नाहीत.यांनी मंञी पदे भोगली ती फक्त स्वत:चे व पाहुणेरावळ्यांचे खळगी भरण्यासाठी ३५ वर्ष सत्तेत राहिलेल्या या जिल्हयातील राष्ट्रवादिच्या नेत्यांनी शेतकर्यासाठी काय दिलं असेल फक्त दुष्काळ आणि शेतकर्यांच्या आत्महत्या.आज पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बघा व आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बघा याचा जाब राष्ट्रवादिचे नेते धाराशिवच्या जनतेला देतील का?असा सवाल शंकरराव बोरकर यांनी राष्ट्रवादिच्या नेत्यांना केला.कार्यकर्त्यांनी फक्त यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीचा झेंडा घेऊन प्रचार करायचा व संतरंज्या उचलायच्या सगळी पद घरातच हे  राजकारण फक्त राष्ट्रवादितच होऊ शकतं.शिवसेनेत गरीब कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय.बाळासाहेब ठाकरे यांची सर्व शिवसैनिकांना एकच शिकवण दिली ती म्हणजे "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण"राष्ट्रवादिचे उद्योग बघा व्हिडीओकॉन बंद,सुतमिल बंद,कौडगाव एम आय डी सी च गाजर ५ वर्षापासुन दाखवतेत,दारफळची गुळ पेटी,तुळजाई व बोरवंटीचा सिध्दविनायक,वडगावच कुकट पालन,असे एक नाही अनेक उद्योगातुन सब सीडी लाटली व जमिनी गिळंकृत केल्या ज्या गोरगरीब शेतकर्यांनी माझ्या भागात उद्योग उभारेल माझी पुढील पिढी सुखात खाईल या दृड आत्मविश्वासाने या राष्ट्रवादिच्या नेत्यांकडे पाहिलं परंतु हाती निराशा आली व या निराशेमुळे शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.
याप्रसंगी उपतालुकाप्रमुख धनंजय वीर,विभागप्रमुख अनंत भक्ते,रवि कोरे आळणीकर,ग्रा.प सदस्य बारीकराव कांबळे,रमाकांत लावंड,श्रीपाल वीर,रंगनाथ कुदळे,दताञ्य किर्दत्त,शाखा प्रमुख अजित वीर,माजी सरपंच सुरेश म्हेञे,विनोद लावंड,वैभव साळुंके,शरद लावंड,विश्वजित वीर,वैभव वीर,अकुंश कोरे,निलेश देशमुख,महेश वीर,सिध्देश्वर तोडकर,शाम लावंड,भैय्या हिंगमीरे,कालिदास वीर,किसन वीर,विनोद महाराज वीर,प्रसाद वीर,किरण वीर,विनोद विश्वासराव वीर,बालाजी तौर,अंकुश माळी,नारायण शिवलिंग माळी,संतोष माळी,सिध्देश्वर म्हेञे,निखिल तोडकर,रामा माळी,उमेश तोडकर,संभाजी माळी,यांच्यासह भाजपा शिवसेना कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top