प्रतिनिधी / उस्मानाबाद
सरत्या आर्थिक वर्षात रूपामाता अर्बन मल्टिस्टेट समूहाचा ९१ लाखांचा नफा झाला आहे. यावर्षी सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रपामाता समूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकट गुंड यांनी दिली.
संस्थेचा एकूण व्यवसाय २५६ कोटींचा असून ठेवीमध्ये १२ टक्के वाढ होऊन होवून समूहाच्या एकूण ठेवी १४७ कोटी झाल्या आहेत. कर्जात २९ टक्के वाढ होऊन एकूण १०६ कोटी कर्जाचे वाटप झाले आहे. सीडी रेपो ७४ टक्के आहे. संस्थेने निकषाप्रमाणे २१ कोटी ६८ लाख बँकेत गुंतवणूक केली. संस्थेने एनपीएची १६५.३७ लाख तरतूद केलेली असून समूहाचा निव्वळ एनपीए ४ टक्के आहे. नऊ हजार ७६४ सभासद असून वसुल भागभांडवलात ६ टक्के वाढ होऊन भागभांडवल २ कोटी ८७ लाख झाले आहे. ९५०० टन क्षमतेचे रुपामाता वेअर हाऊसह स्वमालकीच्या स्वमालकीच्या कोट्यावधींच्या वास्तू आहेत. समूहाच्या सर्व शाखेत लॉकर सुविधा, कोअर बँकिंग, एसएमएस सेवा, आरटीजीएस, एनइएफटी आदी अद्यावत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय मुदतपूर्व कर्ज फेडणान्यास कर्जदारास व्याजात एक टक्के सुट आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक सभासद मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी, व्यवस्थापक सत्यनारायण बोधले यांचे योगदान असल्याचे अध्यक्ष अॅड व्यंकटराव गंुड यांनी सांगितले. 
 
Top