उस्मानाबाद-प्रतिनिधी 
शिवसेनेने उस्मानाबाद जिल्ह्यात दोन सहसंपर्कप्रमुखांची निवड केली असून, त्यानुसार शंकरराव बोरकर यांच्यासोबतच अनिल खोचरे हेही सहसंपर्कप्रमुख असतील. शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये या निवडीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
शिवसेनेत अलीकडे संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर विस्तार करण्यात आला असून, त्यानुसार शंकरराव बोरकर यांच्यावर काही भागाची तर खोचरे यांच्याकडे जिल्ह्यातील अन्य भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
 
Top