उस्मानाबाद-प्रतिनिधी 
आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एकास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई दि.२५ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास प्रसाद कॉलनी येथे करण्यात आली. आरोपी ओंकार दगडू एडके (रा.गावसुद) हा मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने जवळ टॉमी (लोखंडी रॉड), कोयता असे हत्यार बाळगुन एका इमारतीच्या आडोशाला दबा धरून बसला होता. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी त्याला अटक करून आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर मुंबई पोलिस कायद्याचे कलम १२२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Top