उस्मानाबाद /प्रतिनिधी
 निवडणूक आयोगाने दि.१० मार्च २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दि. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान तर दि. २३ मे २०१९ रोजी मतमोजणी होणार आहे.
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखालील आस्थापना, ट्रेड, व्यवसाय, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सार्वजनिक सुटी अथवा दोन तासाची सवलत देण्यात येणार असल्याचे शासनाने कळवले आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवसी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे. 
 
Top