प्रतिनिधी/ उमरगा
माणसाचे जीवन हे कोऱ्या वहिसारखे असते. वहितील पहिले पान जन्म तर शेवटचे पान हे मृत्यूचे आहे. उर्वरित पाने जीवनातील कर्म असते. जी सर्व आपल्या वेगवेगळ्या कर्माने भरली जातात. त्यामुळे देशातील ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्याकडे पाहून कार्य करत रहावे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल विष्णू मोंढे यांनी केलेे.
शहरातील शाताई मंगल कार्यालयात गुरुवारी (दि. २८) रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विष्णू मोंढे बोलत होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष संतराम मुरजानी अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्रांतपाल विश्वनाथ पंचाक्षरी, सचिव डॉ. धनंजय मेनकुदळे आदींची उपस्थिती होती. विष्णू मोंढे म्हणाले की, रोटरी क्लब ही विविध क्षेत्रात कार्य करणारी अांतरराष्ट्रीय संघटना असून दानशूर व्यक्तींच्या मदतीने चालते. याकरीता प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लबकडून उमरगा तालुक्यातील तुगाव येथील इब्राहीम मुजावर आणि नाईकनगर येथील बबिता पवार या दिव्यागांना तीन चाकी सायकल देण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, रोटरीचे माजी प्रांतपाल दीपक पोफळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुशील चव्हाण, डाॅ. उदयसिंह मोरे, डाॅ. सुचेता पोफळे, डाॅ. विक्रम आळंगेकर, लातूर रोटरी मेघराज बरबडे, नितीन होळे, प्रदिप चालुक्य यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. 
 
Top