उस्मानाबाद/प्रतिनिधी -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्चचे मासिक वेतन दि. १० एप्रिलपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत शनिवारी (दि. ३०) शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. १४ एप्रिल रोजी जयंती आहे. जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन दि. १० एप्रिल पूर्वी शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, प्रशांत जाधवर, विनय सारंग, ए. यु. लोमटे, बी.व्ही. चादरे, एस. जी. रायजादे, पी. एस. खोबरे, ज्योती राऊत, सुलभा पवार, एस. एल. वाकुरे, व्ही. बी. मडके, व्ही. बी. क्षीरसागर, अमोल गायकवाड, प्रशांत महाजन, प्रदीप गाडे, आण्णासाहेब मोरे, अभिमान पेठे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 
 
 
Top