इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
 स्पर्धेचे युग असल्याने स्पर्धेला तयार रहावेच लागते, यासाठी शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा ईतिहास आपल्याला प्रतीकुल परिस्थितीत यश मिळविण्याची प्रेरणा देणारा आहे. त्यांनी केलेली स्वराज्याची स्थापना युवकांच्या प्रेरणेचे स्रोत आहे. कमी सैनिक असतानाही जिंकता येते. हा आत्मविश्वास वाढवणारा मंत्र आहे.
भविष्याच्या निर्माणासाठी त्यांचे विचार आत्मसात करुन आजच्या शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी  इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. असे मत रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे यांनी व्यक्त केले. शिवजयंतीच्या निमीत्ताने मायक्रोकॉम कॉम्प्युटर एज्युकेशन व रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने तालुक्यातील विवीध शाळेत  घेण्यात आलेल्या  'शिवज्ञान' स्पर्धेचे पारितोषीक वितरण कार्यक्रम उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालय घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. पोफळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष संतराम मुरजानी होते. तर प्रमुख म्हणुन शिवव्याख्याता रेखा सुर्यवंशी, रोटरीचे सचिव प्रा. धनंजय मेनकुदळे, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. गुंडू दुधभाते, माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, मनिष सोनी, अशोक बनसोड, अदि उपस्थिती होते. यावेळी शिवव्याख्याता सौ. सुर्यवंशी म्हणाले की, आपल्या महामानवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून  त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करत विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवायचे आहे. कारण जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवतो, अशा स्पर्धांच्या माध्यमातून मुले शिवचारित्र्याचा अभ्यास करत आहेत ही आपल्या सर्व समाजासाठी गौरवास्पद बाब आहे यामुळे एक वैचारिक, प्रगल्भ पिढी निर्माण होईल. 
यावेळी तालुक्यातुन प्रथम कुलदीप बिराजदार, द्वितीय श्रीकांत बिराजदार तृतीय अनिकेत मोरे, सुरेश आष्टे यांच्यासह तालुक्यातील विवीध शाळेतुन आलेल्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तालुक्यातील भारत विद्यालय, (कै) शरणप्पा मलंग विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय उमरगा, माधवी चालुक्य विद्यालय, शिवरामत चालुक्य विद्यालय कुन्हाळी, जिल्हा परिषद प्रशाला उमरगा, जिल्हा परिषद प्रशाला मुळज, स्वामी विवेकानंद विद्यालय त्रिकोळी, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय जकेकुर, भारत विद्यालय बेडगा, महात्मा गांधी विद्यालय डिग्गी, शिवशक्ती विद्यालय एकुरगा, ग्रामीण प्रशाला माडज, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड, भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालय, येळी आदी शाळांसह विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  प्रा.युसुफ मुल्ला व सुत्रसंचालन संजय बिराजदार यांनी केले तर आभार  मुरजानी यांनी मानले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top