प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करण्यात येत आहे. येणाऱ्या १८ तारखेला एकही मतदार मतदानाशिवाय राहणार नाही,असा प्रत्येक मतदाराने निश्चय करावा, यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून मतदारांचे प्रबोधन करीत आहे.मतदान करा, लोकशाही बळकट करा,असे आवाहन करण्यात येत अाहे. 
अभियानाचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने एक स्टीकर तयार केले असून ते स्टीकर दुचाकी-चारचाकी वाहने, एटीएम सेंटर, पिण्याच्या पाण्याचे माठ, गॅस सिलिंडर, प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालये, बाजार, दुकाने, हॉटेल्स, शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी दर्शनी भागांवर चिकटविण्यात येत आहेत. या स्टीकर्सवर "येणाऱ्या १८ एप्रिलला मतदान करा, लोकशाही बळकट करा,' असा संदेश देण्यात आला आहे. 
मतदाराचे प्रबोधन करण्या साठी स्टीकर तयार केले आहे. हे स्टीकर एटीएम केंद्रात लावले. 
 
Top