उस्मानाबाद/प्रतिनिधी
 पहिल्या मजल्यावर प्रवेश करून घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून सोन्या चांदीसह २ लाख ८८ हजार रुपयांचो ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.३१) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. वाशी येथे तीन अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यातील हॉलची कडी कोयंडा तोडून जिन्याच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावर प्रवेश करून फिर्यादी महिला व फिर्यादी महिलेच्या मुलीस चाकूचा धाक दाखवून २ लाख ८३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ५ हजार असा एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच डॉ. तानवडे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला. 
 
Top