प्रतिनिधी / उस्मानाबाद
जमीन कळंब पालिकेच्या हद्दीत नस्ताना खोट्या कागदपत्राच्या आधारे दस्त नोंदणी केल्याची घटना २० मार्च २००६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान घडली. याप्ररकणी शनिवारी (दि.३०) दुय्यम निबंधक श्रेणी -१ कळंब यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दुय्यम निबंधक कार्यालय कळंब येथे नागनाथ माळी (रा. दत्तनगर कळंब), संजय अंबीरकर (रा. डिकसळ), आनंद घोलक (रा. कौडेवाडी ता. वाशी), पवन गायकवाड (रा. भाटसांगवी), उल्हास कागदे पाटील (रा. गोलेगाव), अनंत मडके (रा. मोहा), मुसद्दीक काझी, महादेव घुले, जुबेर शब्बीर काझी, युसुफ अली सय्यद, आप्पाराव पवार (सर्व रा. कळंब), हिरामण प्रभू काळे व दोन महिलांनी तक्रारदार शंकर खबाले, गोविंद खबाले यांच्या मालकीची जमीन नगर परिषद कळंब हद्दीत नाही. असे असताना नगर परिषद हद्दीत असल्याचे सांगून दुय्यम निबंधक कार्यालयात सदरची जागा असल्याबाबतचे कागदपत्र जोडुन खोट्या कागदपत्राच्या आधारे दस्त नोंदणी केली. याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी -१ कळंब यांच्या फिर्यादीवरुन अरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
 
Top