उस्मानाबाद/प्रतिनिधी
 बाहेर राज्यातील वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती ठाण्यात देणे बंधनकारक असताना दिली नाही. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.३०) गुन्हा दाखल झाला. बालाजी कन्स्ट्रक्शन कोरगाव वाडी (ता. उमरगा) येथे अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशान्वये बाहेर राज्यातील वास्तव्यास असलेल्या व्यक्तीची माहीती पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक असताना सुरेश मनोहर पिंड (रा. मसलगाव ता. निंलगा जि. लातूर ह.मु. बालाजी कन्स्ट्रक्शन कोरगाव वाडी ता. उमरगा) याने राजस्थान राज्यातील ७ व्यक्तीची नावे व त्यांची माहीती पोलिस ठाण्याला दिली नाही. सुरेश मनोहर पिंड याने अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी सुरेश पिंड याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
 विशेष नियोजन बिले मंजूर करण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता कोषागार कार्यालयाने विशेष नियाेजन केले होते. याकरीता दहा ‌वेगवेगळे टेबल तयार करण्यात आले होते. यानुसार बिले मंजूर केली जात होती.तसेच बिले मंजुर करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले असुन या सॉफ्टवेअरमुळे काम अधिक सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. 
 
Top