उस्मानाबाद, प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे
तक्रार निवारण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे .या कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून जिल्हा नियोजन
अधिकारी सुधाकर आडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष 24 तास चालू असणारआहे.
या कक्षातील दूरध्वनी क्रमांक 02472-223412 आहे. याकरिता आवश्यक कर्मचारी नियुक्त
करण्यात आलेले असून मतदारांना मदतकक्षामध्ये दूरध्वनीद्वारे निवडणूक व आचारसंहितेचे संदर्भातील
तसेच निवडणूकविषयी इतर अनुषंगिक बाबींसंदर्भात तक्रार नोंदविता येणार आहे. त्याशिवाय मतदार
यादीतील त्यांचे नाव शोधून देण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये देखील ही सेवा 24 तास उपलब्ध करून
देण्यात आली आहे, असे तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष प्रमुख श्री. सुधाकर आडे यांनी कळविले आहे.