उस्मानाबाद |प्रतिनिधी
 भरधाव दुचाकी चालवून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना १४ मार्च रोजी घडली असून रविवारी (दि.२४) उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उमरगा येथे करण रघुराम जाधव (रा. पळसगाव) बसवा मेडिकल समोरून रस्त्यावर चालत जात होते. त्यावेळी शुभम भालेराव याने त्याचे ताब्यातील दुचाकी (क्र. एम.एच. २५ एस. ३७२१) हयगयीने चालवून करण जाधव यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये जाधव यांचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा नोंद झाला आहे.
 
Top