उस्मानाबार/प्रतिनिधी
मंगरूळ बीट अंतर्गत जि.प.प्र.शा.धोञी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद येथील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षीका श्रीमती स्वामी रंजना कमलाकर यांनी मिशन कॉलरशीप हे अॅप तयार केले. हे अॅप प्लेसस्टोअर वर अपलोड करुन सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले आहे.
मुलांच्या जवळचा मिञ मोबाईल झाला असुन तासंतास मुले मोबाईल वर गेम खेळत असतात. याच त्यांच्या आवडीचा उपयोग करुन श्रीमती स्वामी यांनी मोबाईल वरील अभ्यासक्रमाचे विविध अॅप तयार केले आहेत. यातील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचा सर्वांना उपयोग झाला.
मंगरुळ बीट ता.तुळजापूर येथे मा.शिक्षण विस्तारआधिकारी श्री.मल्हार माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2018-19 मध्ये मिशन स्कॉलरशीप हा विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला आहे. याच उपक्रमातुन हे शिष्यवृत्ती अॅप तयार करण्याची कल्पना श्रीमती स्वामी यांना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवली.
मिशन स्कॉलरशीप,पाचवी शिष्यवृत्ती , पाचवी स्कॉलरशिप असे तीन अॅप तयार केले असुन एका अॅप मध्ये 150 प्रश्नांचा सराव विद्याथ्र्यांना करता येतो. आपले उत्तर चुक की बरोबर लगेच समजत असुन गुणांची संख्या ही मुलांना तिथेच कळून येते. म्हणून असे आनंददायी अॅप मुलांना सोडवताना निश्चीतच खेळातून गुणवत्तेकडे घेऊन जाणारे ठरते.
