उमरगा /प्रतिनिधी 
शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने उमरगा, लोहारा, भुम, परंडा यासह जिल्ह्यातील समर्थकांनी शनिवारी (दि. २३) रात्री न्याय मागण्यासाठी "मातोश्री'मंुंबईकडे कूच केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर मध्यरात्री उमरगा, तुळजापूर येथेच त्यांना अडवून नोटीस बजावत परत पाठवण्यात आले. यावेळी काही समर्थकांनी ट्रव्हल्स सोडून इतर वाहनांनी मुंबईची वाट धरली. 
याकरिता उमरगा येथून तीन, लोहारा येथून दोन, अन्य ठिकाणाहून सहा खासगी बसमध्ये हजारो कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे निघाले होते. याबाबत माहिती मिळताच उमरगा येथील बस शहरातच तर लोहारा येथील बस तुळजापूर येथे अडवण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी शिवसैनिकांना नोटीस देऊन रविवारी सकाळी आठच्या अगोदर गाव सोडू नये, अशी सूचना करण्यात आली होती.मात्र काही समर्थक रातोरात इतर वाहनांची व्यवस्था करून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले. 
 
Top