प्रतिनिधी / लोहारा-
शहर व परिसरात शनिवारी (दि.३०) सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसास सुरुवात झाली. सायंकाळी ६.४० च्या सुमारास शिवनगरातील रमेश वचने-पाटील यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. 
या झाडाजवळ काही जनावरे, शीतपेयांच्या एजन्सीचा माल होता. परंतु तरुणांच्या प्रयत्नामुळे नुकसान टळले. या घरापासून काही अंतरावरील मनोज लोखंडे यांच्या घरासमोरील झाडावरही वीज कोसळल्याचे समजते. परंतु, कोणतेही नुकसान झाले नाही. जुन्या गावातील मस्जिदच्या आवारातील झाडावरही वीज कोसळल्याचे समजते. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले, ज्वारी भिजली. वीज गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. 
 
Top