उस्मानाबाद /प्रतिनिधी -
येथील भीमनगर क्रांती चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारपासून (दि. १) विविध स्पर्धा व कार्यक्रमांसह भीम फेस्टिव्हल २०१९ चे ही आयोजन केले आहे.
सोमवारी सकाळी क्रांती चौकातून संविधान सन्मान फेरी काढण्यात येणार आहे. क्रांती चौकात फेस्टिव्हल कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि. ३) महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, 'मी वाचलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर लहान गटातून निबंध वाचन स्पर्धा, गुरुवारी (दि. ४) लहान गटातील वेशभूषा स्पर्धा, शुक्रवारी (दि. ५) झंकार ऑर्केस्ट्रा, दि. ६ व ७ एप्रिलला मुलींसाठी विविध गुणदर्शन, दि. ८ रोजी स्वरगंध ऑर्केस्ट्रा, दि. ९ व १० रोजी मुलांसाठी विविध गुणदर्शन, तसेच 'भारतीय लोकशाही काल आणि आज' या विषयावर तुळजापूर येथील राजन जोगदंड यांचे व्याख्यान तसेच दि. १४ एप्रिलला सकाळी १० वा. भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास मार्गदर्शन रामराजे पाटील, विद्यानंद बनसोडे, मोहन बनसोडे यांची उपस्थिती असेल. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष नवीनकुमार बनसोडे, कार्याध्यक्ष अमित सोनवणे, उपाध्यक्ष आशाताई झिंगाडे यांनी केले आहे. 
 
Top