
शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दील गाजी (रहे) यांच्या उरूसानिमित्त शुक्रवारी (दि.२९) कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन अॅड. परवेज अहमद यांच्या हस्ते केले. स्पर्धेतील मानाची कुस्ती उस्मानाबादचे मल्ल सागर लोहार व गोंधळवाडीचे मल्ल नामदेव सातपुते यांच्यात झाली. यामध्ये लोहार विजयी ठरले. यावेळी जिल्हा वक्फ अधिकारी अहमद खान, माजी वक्फ अधिकारी महमद शेख, मुस्ताक हुसेनी, अॅड. परवेज अहमद, पंच कुरेशी, अजीम कुरेशी, खलीफा कुरेशी, सौदागर, ओंकार नायगावकर, समियोद्दीन मशायक आदींची उपस्थिती होती.