उस्मानाबाद- प्रतिनिधी
 लोकसभा निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत ८ जणांचे १० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून मंगळवारी (दि.२६) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
जकीय गरमागरमीनंतर शिवसेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली. तुळजापूर रोडवरील आण्णाभाऊ साठे चौक येथून सेना-भाजप व महायुतीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातून जंगी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत ओमराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या हजेरीत ओमराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी गेटबाहेर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास निघालेली ही रॅली दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहचली. यावेळी पालकमंत्री अर्जून खोतकर, संपर्कप्रमुख आमदार प्रा. तानाजी सावंत, भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या उपस्थितीत ओमराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मंुढे यांच्याकडे सोपविला.यावेळी शंकरराव बोरकर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, कैलास पाटील, कैलास शिंदे आदी उपस्थित होते. 
 
Top