रिपोर्टर: जिल्हयाच्या मुलभूत गरजा ओळखून त्याची पुर्तता केली तर जिल्हयाचा विकास होवून बेकारी कमी होईल.त्यामुळे आपप्रचार करण्यापैक्षा जिल्हयाच्या विकासासाठी काम करा आसा सल्ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.गेल्या पाच वर्षात जिल्हयाच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या काही प्रकल्पाला सुध्दा सत्तेत आसणारांनी विरोध केल्यामुळे ते पुर्ण होवू शकले नाहीत असे पाटील यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये सांगीतले.

मी पाच वर्ष राज्यमंत्री आसताना जिल्हयाच्या विकासाचा दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून काम केले आहे.पुढील काळात ही ते चालु राहील परंतु काही प्रवृत्ती आपल्या विषयी आप प्रचार करूण विकासाच्या मुदयाला बाजू देत आसल्याचे दिसत आहे.जिल्हयातील बेरोजगारीचा विषय महत्वाचा आहे.त्यामुळे उस्मानाबाद ची ओदयोेगिक वसहात विकसीत करणे गरजेचे आहे.त्यामाध्यमातुन तरूणांना रोजगार उभा राहु शकतो.गेल्या काही वर्षात उस्मानाबाद जवळील कौडगाव ओेेैदयोगिक वसहातीमध्ये मी 50 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प मंजूर करूण घेतला परंतु सरकारने त्याची निवीदा न काडल्याने तो प्रकल्प रखडला गेला.पाच वर्षात सारखा पाठपुरावा करूण सरकारने साधी बैठक सुध्दा घेतली नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

पुढील काळातील विकासाच्या कामाची लिष्ट तयार:

पुढील काळात केंद्राकडून रोजगार निर्मीतीसाठी जिल्हयात सोलार प्रकल्पाची मोठया प्रमाणात उभारणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पर्याटनासाठी केंद्राची योजना जिल्हयात राबवण्याचे ठरवले आहे.यामुळे जिल्हयातील तरूणांना रोजगार मिळणार आसुन केंद्राच्या मदतीने उस्मानाबाद जिल्हयातील रामलींग,कुथनगिरी,तूळजापुर,येरमाळा,तसेच जिल्हयात आसलेले पुरातन किल्ले यासाठी केंद्राचा निधी वापरूण या स्थळांचा विकास केला जाईल आणि त्यामधुन रोजगार निर्मीती केली जाईल.त्याच बरोबर टुरीझम सेवा यासारखा उदयोग सुध्दा उस्मानाबाद मध्ये चालु होवू शकतो.आशा प्रकारचा एकही प्रकल्प पाच वर्षात जिल्हयात झाला नाही त्यामुळे बेकारी बाढली आसल्याचे आमदार पाटील यांनी सांगीतले.उस्मानाबाद जिल्हयासाठी रेल्वेचा मुददा महत्वाचा आसुन उत्तर दक्षिण जाणा—या रेल्वे गाडया घेण्याची मागणी करूण सोलापुर,बरहानपुर या मार्गासाठी सुध्दा पाठपुरावा करणार आसल्याची माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.
        
 
Top