उस्मानाबाद,/प्रतिनिधी 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सोमवार दि. 25मार्च 2019 रोजी एकूण 13 जणांनी 19 नामनिर्देशन फॉर्म  घेतले. अशा प्रकारे आत्तापर्यंत एकूण 63 जणांनी127 अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.
       नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -
1. श्री. नवनाथ दशरथ उपळेकर (मु.पो. उपळे (मा.), उस्मानाबाद (अपक्ष)) 2. श्री. राणा जगजितसिंह पाटील(मु.पो. तेर, उस्मानाबाद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)) 3. श्री. विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (मु.पो. लिंबाळा, जि. लातूर (क्रांतिकारी जयहिंद सेना)) 4. श्री. अर्जुन सिद्राम सलगर (मु.पो. सिरगापूर, उस्मानाबाद (वंचित बहुजन आघाडी)) 5. श्री. सुशिलकुमार दत्तात्रय जोशी (मु.पो. कारी, जि. सोलापूर(अपक्ष)) 6. श्री. ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (मु.पो. गोवर्धनवाडी, उस्मानाबाद (शिवसेना)) 7. श्री. विष्णू गोविंद देडे, शिवाजी नगर, उस्मानाबाद (अपक्ष) 8. श्री. तुकाराम दासराव गंगावणे (मु. पो. परंडा, उस्मानाबाद (अपक्ष)
 
Top