धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था असलेल्या इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन (IEA) च्या १०९ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे माहितीपत्रक (Brochure) नुकतेच अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित राष्ट्रीय परिषद २७ ते २९ डिसेंबर २०२६ या कालावधीत ग्राफिक इरा (डीमड् टू बी युनिव्हर्सिटी), डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित केली जात आहे.
या परिषदेच्या माध्यमातून देशातील विकासविषयक धोरणांवर सखोल मंथन होणार असून, इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे सह-प्रादेशिक सचिव (Regional Joint Secretary) तथा ठाणे, मुंबईचे डॉ. दीपक पोपट साबळे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व अर्थशास्त्र प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि अर्थशास्त्रप्रेमी नागरिकांना या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे.
परिषदेची मुख्य संकल्पना (Main Theme):
या १०९ व्या वार्षिक परिषदेची मध्यवर्ती संकल्पना “विकसित भारताचे आयाम: विकासाच्या पुनर्रचनेवर धोरणात्मक चर्चा” (Dimensions of Viksit Bharat: Policy Debate on Reimagining Development) ही ठेवण्यात आली आहे. भारताला २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्याच्या प्रवासात पारंपारिक जीडीपीच्या (GDP) निकषांच्या पलीकडे जाऊन मानवी कल्याण, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचा वेध घेणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
तांत्रिक सत्रे व उप-विषय (Conference Sessions & Sub-Themes):
परिषदेत खालील ५ प्रमुख तांत्रिक सत्रांतर्गत विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत आणि सखोल चर्चा होणार आहे:
*सत्र १ - विकसित भारत: जीडीपीच्या पलीकडे जाऊन विकासाचा पुनर्विचार - विज्ञान, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि स्वदेशी ज्ञान प्रणाली
(Viksit Bharat: Rethinking Development Beyond GDP - Science, Technology, Innovation and Indigenous Knowledge)
*सत्र २ - विकसित भारतासाठी स्वावलंबी आणि तंत्रज्ञान-प्रेरित रचनात्मक रूपांतरण
(Self-Reliant and Technology-Led Structural Transformation for Viksit Bharat)
सत्र ३ - वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि विकसित भारतासाठी विकास वित्तपुरवठा
(Financial Sector Reforms and Development Finance for Viksit Bharat)
सत्र ४ - आर्थिक मुत्सद्देगिरी आणि भारताची जागतिक विकास धोरण रणनीती
(Economic Diplomacy and India's Global Development Strategy)
सत्र ५ - विकसित भारतावर राज्यस्तरीय दृष्टिकोन: उत्तराखंडचा विकासात्मक अनुभव आणि धोरणात्मक नवोपक्रम
(State Perspectives on Viksit Bharat: Uttarakhand's Development Experience and Policy Innovations)
सहभागासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क:
या भव्य राष्ट्रीय परिषदेमध्ये मौखिक शोधनिबंध सादर करणे (Oral Paper Presentation), पोस्टर प्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधी (Delegate) म्हणून सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अर्थशास्त्राचे प्राध्यापक, महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षक, संशोधक (Research Scholars) व या क्षेत्रात रुची असणाऱ्यांनी अधिक माहिती, मार्गदर्शक तत्त्वे आणि सहभागासाठी डॉ. दीपक पोपट साबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे विशेष आवाहन करण्यात येत आहे.