धाराशिव (प्रतिनिधी)- दि.26 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय संविधान दिन असून या दिना निमीत्त मतदार जनजागरण समिती धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे,या रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवुन व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बार्शी नाका माता जिजाऊ चौक येथुन दि.26 नोव्हेंबर 2026 वार रोजी सकाळी 10:30 वा.सुरुवात  होणार आहे. गतवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी रॅलीत आपल्या सहका-या सोबत सहभागी होवून “संविधान जनजागरण रॅली“ ची शोभा वाढवावी.सदर रॅली श्री.भोसले हायस्कुल,जॉन मलेलु चर्च,छ. संभाजी महाराज चौक,(आर्य समाज चौक),अंबाला हॉटेल,त्रिशरण चौक,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,मारवाडी गल्ली,काळा मारूती चौक,ताजमहल टॉकीज, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम चौक, छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत समारोप होणार आहे.तरी सर्वांनी भारतीय संविधान जनजागरण रॅलीत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मतदार जनजागरण समितीच्या वतीने कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.

 
Top