उमरगा (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरील अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी प्रतापूर येथील बालाजी पाटील हे सरसावले असून त्यांना आमदार शरणू सलगर यांचे बळ मिळाल्याने भविष्यात बदल घडवित यश संपादन करताना मतदारांना पहावयास मिळेल असे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. 

नुकतेच कर्नाटक सरकारने तालुका पंचायत (TP) व जिल्हा परिषद (ZP) चे आरक्षण जाहीर केले. या मध्ये जिल्हा परिषद प्रतापूर, ता. बसवकल्याण,जिल्हा बीदर येथील आरक्षण हे खुला (Open) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. या प्रतापूर जिल्हा पंचायत मध्ये घोटाळ, जाजन मुगळी, मन्नाळी, मदनेवाडी, रामतीर्थ, हाळी, उमापूर, मोरखंडी, तळभोग, चौकीवाडी, प्रतापूर निलकंठ, खानापूर असे यामध्ये साधारण 16 ते 17 लहान - मोठे गावे येतात.  

या 16 - 17 गावातून साधारण 40 ते 50 भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत कार्यकर्ते हे बसवकल्याण चे लाडके आमदार आदरणीय शरणू सलगर यांना भेटण्यास गेले व या सर्व कार्यकर्त्यांनी बालाजी विजयकुमार पाटील रा. प्रतापूर यांना आम्ही बहुमताने निवडून आणतो असे आमदार महोदयांना शब्द दिले. 


बालाजी पाटील हे गेली 10 ते 12 वर्षे झाले आदरणीय आमदार शरणू सलगर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.आज सर्व पंचक्रोशी मध्ये बालाजी पाटील यांच्या नावाचीच चर्चा सध्या सुरू आहे. एक प्रामाणिक माणूस म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांचे नाव मतदार संघात आघाडीवर आहे. त्यांचे मतदार संघातील विविध कामे, मनमिळावू स्वभावामुळे व गोरगरीबांचे कामे करण्याचा हातखंडा असल्यामुळे सर्वत्र बालाजी पाटील या़चे नावाची शिफारस विविध गावांतील पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांना नेत्यांकडे केल्याने त्यांचे नाव फायनल झाले आहे असे दिसत आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top