तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर रुरल गावाच्या शिवारातील सर्व संयुक्त शेतकरी खातेदारांनी अग्रिम रक्कम मिळविण्यासाठी आवश्यक शपथपत्र किंवा संमतीपत्र तलाठी कार्यालय, त येथे दाखल करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

तुळजापूर रुरल शिवारातील संयुक्त व सामाईक शेतकरी खातेदारांना अग्रिम रक्कम मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी शपथपत्र किंवा संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती तलाठी कार्यालयात जमा करावीत. पात्र शेतकरी खातेदारांना 5 हजार रुपये अग्रिम रक्कम मिळणार असल्याने संबंधित सर्व संयुक्त खातेदारांनी या सूचनेची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही वेळेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top