तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-धाराशिव महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास हॉटेल अरुणचंदसमोर स्कुटी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 25 वर्षीय व्यापारी गणेश बळीराम जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश बळीराम जगताप हे गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून स्कुटीवरून घरी जात होते. तुळजापूर-धाराशिव महामार्गावरील हॉटेल अरुणचंदसमोर ते आले असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गणेश जगताप यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्तीही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गणेश जगताप यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या अकाली निधनाने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 
Top