धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने 62वी पुरुष, महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा अहिल्यानगर येथे दि. 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी धाराशिव पुरुष/महिला संघाची प्राथमिक निवड चाचणी दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05.00 वाजता जिल्हा प्रशिक्षण संस्था धाराशिव च्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी सोबत जन्म दाखला, अथवा 10 वी बोर्ड प्रमाणपत्र, आधारकार्ड, शाळा/कॉलेज ओळखपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे आणणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार असल्याने सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील. तरी धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन द उस्मानाबाद जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
