धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील चिलवडी येथील यशवंत उर्फ बुबासाहेब माधवराव जाधव (वय 78 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे गाढे अभ्यासक होते. तसेच त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न, त्यांच्या पाल्यांना नोकरी, अनुदान यासाठी गेल्या 40 वर्षांपासून अव्याहतपणे कार्य केले.

कृषी क्षेत्रामध्ये 1976 ला (सिडलेस सोनाका द्राक्षाची) नवीन जात विकसित केल्यामुळे त्यांच्या शोधाची दखल आर.सी.एफ. ने घेत त्यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. याबरोबरच  ग्रामीण भागातील महिला आरोग्य विषयक जनजागृती कार्याची दखल घेत नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटलने कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर बालपणातील हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी अन्यायाविरुद्ध प्रखर लढा दिला. त्यांच्या पार्थिवावर चिलवडी शिवारातील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अनेक मान्यवर नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top