धाराशिव (प्रतिनिधी)- उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, तसेच समान कामासाठी समान वेतन या तत्वानुसार न्याय्य वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.17 नोव्हेंबर 2026 पासून सुरु करण्यात आलेल्या बेमुदत संपास शेतकरी संघर्ष समिती, जिल्हा धाराशिवच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. असे पत्र न्यायालयीन कर्मचारी संघटनेला संजय पाटील दुधगावकर यांनी दिले आहे.
“समान काम, समान वेतन” हे तत्व विचारात घेऊन दुय्यम न्यायालयातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय्य वेतनवाढ व सुधारित वेतनश्रेणी तातडीने लागू करावी. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी शेतकरी संघर्ष समिती, जिल्हा धाराशिवच्या वतीने मागणी आहे.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरु असलेल्या या आंदोलनात शेतकरी संघर्ष समिती, जिल्हा धाराशिव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या संघर्षाला आमचा नैतिक व संघटनात्मक पाठिंबा कायम राहील. शासनाने संघटनेच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करुन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी संजय पाटील दुधगांवकर यांनी केली आहे.
