तेर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेमध्ये धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत इयत्ता आठवीतील तृप्ती विठुबोने  व  नारायण बंडे या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी बारा हजार रुपये अशी एकूण चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांना  परीक्षा विभाग प्रमुख  बी. डी .कांबळे, एस.एस. बळवंतराव  , जे.के. बेदरे ,ए.एन. रणदिवे , वर्गशिक्षक एस.यू. गोडगे यांचे  मार्गदर्शन मिळाले.

 शाळेचे मुख्याध्यापक एस.एन. ढाले , पर्यवेक्षक एम.बी. काणेकर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 
Top