मुरुम (प्रतिनिधी)- श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.डॉ. कदम प्रवीणकुमार, प्रा. चव्हाण देविदास,प्रा. पवार भाऊ, प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. इंगळे अमोल, मोरे विजय, दुर्गे माधव,आदित्य सूर्यवंशी,सुरवसे दगडू व प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षण्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
