धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धाराशिव जिल्हा संपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.

मराठी माणसाचे हक्क, स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवणारे थोर नेते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. त्या अगोदर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे नेते संजय निंबाळकर,उत्तम कांबळे,शिवाजी सरडे, प्रवीण कोकाटे, विक्रम पाटील  शौकत शेख, हणमंत देवकते, पांडुरंग भोसले, रवि वाघमारे,पंकज पाटील अतिश पाटील, तानाजी जाधवर, राणा बनसोडे, सुरेश गवळी,राकेश सूर्यवंशी,विजय ढोणे,पंकज पडवळ,सुमित बागल,सुनील वाघ,सुनील गायकवाड,पंकज स्वामी,सतिश लोंढे,नरसिंह शेंद्रेकर, संदीप गायकवाड, मनोज पडवळ, बंडू आदरकर,विकास,जाधव,नाना जमदाडे,अभिराज कदम, श्रीकांत माळी, विनोद गायकवाड, सत्यजित पडवळ, किशोर साळुंखे, दत्ता शेटे यांची उपस्थिती होती.


 
Top