तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सन 1984 च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सेवापूर्ती झालेल्या वर्गमित्रांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. खुशालचंद बोहीती हे होते.यावेळी प्रभाकर घाटूळे, विकास चौगुले, सतीश वाघे, सतीश वाघमारे, आण्णासाहेब बिटे, प्रेमराज पाटील, महादेव मुळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरहरी बडवे यांनी केले तर सूत्रसंचालन सुधाकर फासे यांनी केले तर आभार दत्तात्रय माने यांनी मानले. यावेळी विशाखा वाघे, मल्हार वाघे, विक्रांत वाघमारे, संजय जाधव, भगवान खंदारे,, गोरख देवकुळे, विक्रम मस्के, प्रताप नाईकवाडी, सुनिल माने, संजय खरात, नानासाहेब बिटे, विद्याधर दिक्षित, राजेंद्र कोळपे, राजेंद्र घोगरे, भागवत राऊत, राहुल गायकवाड, रामेश्वर डोंगरे, मिरा चौगुले,तनुजा चौगुले, अनीता घाटूळे, अनिता बिटे, वनिता वाघे, अनुराधा पाटील, शैला मुळे, उषा वाघमारे, सुनंदा पांढरे, संगिता कानडे,सरू आगाशे, प्रगती वाघमारे, सुनिल पतंगे,शशीकांत हाजगुडे,आगतराव बुकन, पद्माकर फासे,अंगद चंदले, युवराज इंगळे, नारायण खंदारे, हेमंत व्यास, सदाशिव धुपेकर आदी उपस्थित होते. यावेळी सदाशिव धुपेकर यांनी श्री संत गोरोबा काका यांच्यावरील अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
