धाराशिव (प्रतिनिधी)- गट साधन केंद्र, धाराशिव येथील दिव्यांग निर्देशक तथा विशेष शिक्षिका दिपाली वाघमारे यांनी आदर्श आश्रमशाळा, शिंगोली येथे भेट देऊन विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थिनींसाठीच्या प्रोत्साहन भत्ता योजनेची माहिती दिली. इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र दिव्यांग विद्यार्थिनींना वार्षिक दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात असल्याचे त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सांगितले. यावेळी शाळेच्या वतीने दिपाली वाघमारे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि आदर्श शिक्षक शाम सुंदर तनमोर लिखित इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, प्रभारी मुख्याध्यापक सतीश कुंभार, सहशिक्षक सचिन राठोड आणि विद्यार्थी उपस्थित होते.
